बेंगलोर प्रदर्शन ठरले सोलापूरच्या विकासाचे टर्निंग पॉईंट

बेंगलोर प्रदर्शन ठरले सोलापूरच्या विकासाचे टर्निंग पॉईंट

सोलापूरची गरुडभरारी

जगाच्या बदलत्या परिस्थितीत सोलापूर आता नकारात्मकतेची कात टाकत आहे. जागतिकीकरणाच्या या जमान्यात विकासाची अनेक दारे खुली आहेत. त्यासाठी मार्केटिंगचा विविध फंडा राबविणाऱ्याना कोणीच रोखू शकत नाही हे तेवढेच खरे आहे. एकेकाळी मँचेस्टर असलेल्या सोलापूर मधील गारमेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्र हे जगात प्रसिद्ध होते. सोलापुरी चादर चा डन्का बजविल्यानंतर आता (युनिफॉर्म) च्या माध्यमातून हेच गतवैभव सोलापूरला पुन्हा प्राप्त होण्याची संधी निर्माण केली आहे. सोलापुरातील युनिफॉर्म व त्याला असलेल्या पूरक वस्तूंच्या उत्पादक व्यापाऱ्यांनी टाकलेले जिद्दीचे पाऊल विकासाची गंगा आणण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहेत. सोलापूरचे युनिफॉर्म संपूर्ण दक्षिण भारतात जाण्याचे प्रवेशद्वार खुलले आहे. सोलापूर युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर असोसिएशन, सोलापूर कापड उत्पादक संघ आणि महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र यांच्या वतीने बेंगलोर येथे आयोजित केलेल्या युनिफॉर्म प्रदर्शनाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. प्रभाकर कोरे कन्व्हेन्शन हॉल, येथे भव्य स्वरूपात हे प्रदर्शन पार पडले. राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख आणि बेळगाव येथील राज्यसभा खासदार मा. प्रभाकर कोरे यांच्या सहकार्यामुळे हे प्रदर्शन होऊ शकले. बेंगलोर सारख्या ठिकाणी पार पडणाऱ्या या प्रदर्शनाचा आर्थिक भर खुप मोठा होता. पण दोहोंच्या सहकार्याने या कामाचे शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो. भारतातील २० राज्यातून १ हजार ९६७, कतार, दुबई, ओमान, यू. एस. ए., माली , फ्रांस, मार्टिन या सात देशातील प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला भेट दिली. सोलापुरात यापूर्वी पार पडलेल्या दोन प्रदर्शनातून खूप काही शिकता आले. पण त्यापुढे पाऊल म्हणून राज्याबाहेर हे प्रदर्शन भरविले याचा भविष्यात गुंतवणूक, रोजगार, पर्यटन आदी बाबतीत खूप मोठा फायदा सोलापुरला होणार आहे. खासकरून इथला युनिफॉर्म व्यवसाय कित्येक पटींनी वाढण्यास मदत होणार आहे. आज बदलत्या काळात आणि स्पर्धेच्या युगात सोलापुरातील उद्योगांना काही तरी नवे करण्याची गरज आहे. या विचारानेच आम्ही युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सदस्य सातत्याने विचार करत होतो. त्यानुषांगानेच आमचे मार्केटिंग करण्यासाठी हा उपक्रम राबविला. त्याची सुरुवात सोलापुरात झाली आन आम्ही आता राष्ट्रीय पातळीवर व काही अंशी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलो आहोत. २०१७ - १८ पासून राज्याबाहेर सोलापूरच्या युनिफॉर्म गारमेंटचे प्रदर्शन भरवावे. सोलापूरच्या आपल्या ब्रँडचे ब्रॅण्डिंग करावे या विचारात सोलापुरातील युनिफॉर्म उत्पादक होते. त्याची सुरुवात सोलापुरात दोन प्रदर्शन भरवून केली. यावेळी हि परदेशातील प्रतिनिधी, विविध राज्यातील प्रतिनिधी आले होते. यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. या विश्वासाच्या बळावर आता सोलापूर बाहेर पाडण्याचे निश्चित केले. त्यानंतर अनेकांकडून दक्षिण भारतात खूप मोठी मागणी असल्याच्या सूचना अनेकांनी केल्या. त्यामुळे बेंगलोर सारख्या शहराची निवड करून सोलापूरचे युनिफॉर्म दक्षिण भारतात पोहचविण्याचे द्वार आम्ही खोलले आहे. विशेष म्हणजे आम्हाला कापड पुरवठा करणाऱ्या देशातील अव्वल १० कंपन्या आजपर्यंत कधीच एकमेकांसमोर आले नाहीत. कित्येक दशकांपासून कापड उत्पादन करत असूनही त्यांच्यामध्ये संवाद झाला नव्हता. पण सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन मुळे त्यांच्यात संवाद झाला. हि घटना आमच्यासाठी खूप कौतुकाची, अभिमानाची ठरली. मफतलाल, वालजी , रिलायन्स, रेमांड, स्पर्श, बॉंबे डाईन, वोकीटॉकी अशा देशातील दिग्गज कंपन्या (टॉप १०) समोरासमोर आल्या. त्यांच्यामध्ये संवाद झाला. यामुळे त्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सोलापूरच्या व्यापाऱ्यांचे कौतुक केले. यामुळे त्यांच्या मनामध्ये सोलापूरबाबत सकारात्मक चित्र, गुंतवणुकीबाबत विचार सुरु झाला आहे. या प्रदर्शनामध्ये अनेक गोष्टी घडल्या, सोलापूरच्या युनिफॉर्म उत्पादक कंपन्यांना शिकायला मिळाले. सोलापुरातील एकूण १०२ व्यापाऱ्यांनी (यापैकी ६० युनिफॉर्म तर ४२ गणवेश पूरक वस्तू, साहित्यांचे उत्पादक) होते.

प्रदर्शनानंतर पुढे काय ?

सोलापूर आणि सोलापूर बाहेर अशा दोन टप्प्यात भरविलेल्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अनेक उद्योजकांनी सोलापुरात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली. एकूणच सकारात्मक चित्र निर्माण केले असून गुंतवणुकीचा अचूक आकडा सांगता येत नसला तरी सोलापुरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची आशा निश्चितच निर्माण झाली आहे. या प्रदर्शनानंतर कापड उत्पादक कंपनीचे अधिकारी, युनिफॉर्म खरेदी करणारे कंपन्यांचे अधिकारी सोलापुरात येऊन भेट देतील. सोलापुरातील गुंतवणुकीस असणारे पोषक वातावरण, मनुष्यबळ, दळणवळण सेवा आदी गोष्टींची चाचपणी करतील. त्यापूर्वी आम्ही त्यांच्या मनात सोलापूरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण, सकारात्मक चित्र उभे केले आहे. या सर्वांचा फायदा सोलापुरातील उद्योजकांना, उत्पादक, व्यावसायिकांना व सोलापुरातील कामगार वर्गाला होणार आहे. यामुळे सोलापुरात गारमेंट पार्कला दिशा मिळाली आहे. सोलापुरात मोठ्या प्रमाणात गणवेश (युनिफॉर्म) तयार मिळतो हे दक्षिणेतील व सबन्ध देशातील उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना कळला. खऱ्या अर्थाने सोलापूरच्या युनिफॉर्मचे ब्रॅण्डिंग झाले .

मुंबईत लवकरच इन्व्हेस्टमेंट समिट घडविणार -

या यशस्वी प्रदर्शनानंतर देशातील बड्या कापड उत्पादक कंपन्यांबरोबर मुंबईत एक समिट घडविणार आहे. यामुळे देशातील टॉप टेन असणाऱ्या कापड उत्पादक कंपन्यांपैकी काही कंपन्या सोलापुरात गुंतवणूक करण्यास तयार होतील. हा प्रयत्न यशस्वी ठरणार असून याबाबत कायम पाठपुरावा चालू आहे.

युनिफॉर्म B2B प्रदर्शन -- * १९०७२ व्यापाऱ्यांच्या विविध राज्यातील अनेक व्यापाऱ्यांनी सोलापूरचे गणवेश खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली. * सोलापुरातील एका व्यापाऱ्यास दार महिना १५ हजार प्रमाणे पुढील ५ वर्षांसाठी ९ लाख शर्ट्स देण्याचा करार केला. * सद्यस्थितीत २५०० कुशल कामगारांची गरज आहे. त्यामुळे अनेकांचे कुटुंबांना (प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष १५०० जणांना ) रोजगार मिळेल. * कामगारांचे कौशल्य वाढविण्यासाठी सिम्बायोसिस विद्यापीठ पुणे यांच्यासोबत प्राथमिक बोलणी झाली आहे. बेंगलोर प्रदर्शनातील महत्वाचे मुद्दे -- - सोलापुरातील एकूण १०२ व्यापाऱ्यांचा सहभाग. - या प्रदर्शनामुळे येत्या २ वर्षात किमान ३००० जणांना रोजगार मिळण्याची शक्यता - देशातील अव्वल १० कापड उत्पादक कंपन्यांची सोलापुरात गुंतवणुकीसाठी तयारी - सोलापूरचे युनिफॉर्म गारमेंट परदेशात पोहोचण्यास आणखी गती मिळेल. - असा प्रयोग देशात प्रथमच झाला - २० राज्यातून १९६७ जणांची तर सात देशाती प्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट. - सोलापूरच्या व्यापाऱ्यांचे देशभरातून कौतुक. - सोलापूरचे मार्केटिंग देशभरात झाले. - प्रदर्शनामध्ये सोलापूरच्या व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष अनेक ऑर्डर्स आल्या. प्रदर्शनानंतर पुढे काय? * नवीन उद्योजक घडतील. * सोलापुरात राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज कंपन्यांची गुंतवणूक वाढेल. * गुंतवणुकीमुळे उपलब्ध रोजगारांपैकी कित्येक पटीने रोजगारामध्ये वाढ होईल. * सोलापूरचे देशात आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर गुंतवणूक वाढेल. आगामी योजना - * ३० देशात सोलापूरच्या युनिफॉर्मचे ब्रॅण्डिंग करणार. * देशाची राजधानी दिल्लीमध्ये मार्केटिंग, ब्रॅण्डिंग लवकरच करणार. * सोलापुरातील कामगारांना कुशल करण्यासाठी प्रतिमहिना ३०० कामगारांना C.S.R फंडातून प्रशिक्षण देणार. srouce : In Solapur News

Leave a Comment: